Gauri_Shankar_Temple (1830) at Bhilpura, Dabhoi
# गौरी_शंकर_मंदिर (1830) बरीच सुंदर मंदिरे केवळ खेड्यांमध्येच बांधली गेल्याने त्यांच्याकडे लक्ष वेधले जात नाही. मी येथे अशाच एका मंदिराला उजाळा देत आहे जे सोशल मीडिया, कलाकार, इतिहास संशोधक आणि लोकांच्या नजरेपासून लांब आहे. दभोई तहसील मधील भिलापूर गावात हे "गौरी-शंकर मंदिर" म्हणून ओळखले जाते. इंटरनेटवर या मंदिराबद्दल अधिक वर्णन नाही; या मंदिरासंदर्भात १ डिसेंबर २०१४ रोजी “टाइम्स ऑफ इंडिया” ने एक लेख प्रकाशित केला होता तेवढीच काय तुटपुंजी माहिती या मंदिरा बद्दल मिळाली.आम्ही भिलापूरला पोहोचलो आणि तेथील एका गावकर्याला या मंदिराबद्दल विचारले. पण इतिहासाबद्दल त्याला काही माहिती नव्हती आणि एवढेच सांगितले की गावात एक जुने मंदिर आहे. त्याने आम्हाला त्या मंदिराची दिशा दाखविली आणि आम्ही तिथे पोहचलो. मंदिरात, काही गावकरी सहमत होते की हे मंदिर “महाराज सयाजीराव गायकवाड - २” यांनी 1830 च्या सुमा...