Posts

Showing posts from January, 2021

अहिल्यापुर येथील होळकरकालीन बारव (प्राचीन खान्देश) (ता. शिरपूर जि. धुळे)

Image
         तेजस्विनी अहिल्याबाई होळकर यांनी संपूर्ण देशभर अनेक विहिरी, घाट, मंदिरे बांधली. त्यातली एक मोठी पायविहीर निदर्शनास आणत आहे. अहिल्यापुर गावात (शिरपुर तालुका, धुळे जी.) सदर पायविहीर बांधलेली असून तिचा स्पष्ट उल्लेख कुठे आढळून येत नाही. बांधकाम कधी केले त्याबद्दलही एकमत नाही. परंतु हि पायाविहीर अतिशय सुबक, मजबुत व होळकर कालीन आहे हे निश्चित. बाहेरून विहीर पडक्या अवस्थेत दिसते, भिंतींवर पिंपळाची झाडे वाढली आहेत, परंतु पायऱ्यानी विहिरीत प्रवेश केल्यावर तिची भव्यता अचंबित करते. ज्या कोणी अभियंत्याने हि विहीर बनवली असेल त्याच्या कौशल्यास दाद द्यावी लागेल. एखादा छोटा राजवाडा असावा त्या प्रमाणे बांधकाम आहे. विहीर एकूण तीन टप्प्यात बांधलेली असून, जसे जसे आपण पुढील दालनात जातो तशी तशी या विहिरीची सुबकता आकर्षित करते. प्रत्येक दालनात महिरपी कमानी आहेत. विहिरीस सुरवाती पासून शेवटपर्यंत एकूण १०६ दगडी पायऱ्या आहेत. विहिरीचे बांधकाम दगड व विटांनी झाले आहे. भिंतींचा पाया चौकोनी दगडांचा असुन त्यावर विटांचा थर रचला आहे. भिंतींमध्ये काही ठिकाणी चक्र, उपद...