कालिका देवी मंदिर (१२ वे शतक ) - हेमाडपंती मंदिर ( Kalika Devi Temple (12th Century) - Hemadpanti Temple )
प्राचीन खान्देश - भाग १ १) कालिका देवी मंदिर (१२ वे शतक ) - हेमाडपंती मंदिर सदर मंदिर हे धुळे जिल्ह्यातील "शिरुड" या छोट्याशा गावात आहे. संदर्भ पुस्तकानुसार हे मंदिर १२ व्या किंवा १३ व्या शतकातील असावे. मंदिराची बांधणी ही हेमाडपंती Style आहे. मंदिराची तटबंदी ही एखाद्या किल्ल्याप्रमाणे वाटते.(फोटो नं २०) मंदिरास २ प्रवेशद्वार आहेत. (फोटो नं ३ , ४) बाहेरील मुख्य प्रवेशद्वारास एक छोटा बुरुज आहे , त्यावर एक सुबक रेखीव चक्राचे शिल्प आहे. त्या चक्रात एकूण २४ पाकळ्या आहेत. मंदिराचे वैशिष्ट्य १ - या मंदिरास शिखर नाहीत , कदाचित हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य असावे. परंतु जेव्हा आपण मंदिराच्या सभा मंडपात प्रवेश करतो व कळसाकडे बघतो तेव्हा कळस बराच खोलवर जाणवतो , कळसाची खोली पाहून असे वाटते की यावर उंच शिखर असावे. भारतीय वास्तुकलेची ही खुबी अधोरेखित कराविशी वाटते. गर्भगृह - गर्भगृह बर्यापैकी विस्तृत आहे. कळस हा अष्टकोनी आहे. गर्भगृहात कालिका देवी ची मुर्ती स्थापन केली आहे. मुर्तीची जडण - घडण बघता ती १२ व्या शतकातील असावी ...