कालिका देवी मंदिर (१२ वे शतक ) - हेमाडपंती मंदिर ( Kalika Devi Temple (12th Century) - Hemadpanti Temple )

 

प्राचीन खान्देश - भाग १

१) कालिका देवी मंदिर (१२ वे शतक ) - हेमाडपंती मंदिर

 

        सदर मंदिर हे धुळे जिल्ह्यातील  "शिरुड" या छोट्याशा गावात आहे. संदर्भ पुस्तकानुसार हे मंदिर १२ व्या किंवा १३ व्या शतकातील असावे. मंदिराची बांधणी ही हेमाडपंती Style आहे. मंदिराची तटबंदी ही एखाद्या किल्ल्याप्रमाणे वाटते.(फोटो नं २०) मंदिरास २ प्रवेशद्वार आहेत. (फोटो नं ३, ४) बाहेरील मुख्य प्रवेशद्वारास एक छोटा बुरुज आहे, त्यावर एक सुबक रेखीव चक्राचे शिल्प आहे. त्या चक्रात एकूण २४ पाकळ्या आहेत.

मंदिराचे वैशिष्ट्य १ - या मंदिरास शिखर नाहीत, कदाचित हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य असावे. परंतु जेव्हा आपण मंदिराच्या सभा मंडपात प्रवेश करतो व कळसाकडे बघतो तेव्हा कळस बराच खोलवर जाणवतो, कळसाची खोली पाहून असे वाटते की यावर उंच शिखर असावे. भारतीय वास्तुकलेची ही खुबी अधोरेखित कराविशी वाटते.

गर्भगृह - गर्भगृह बर्यापैकी विस्तृत आहे. कळस हा अष्टकोनी आहे. गर्भगृहात कालिका देवी ची मुर्ती स्थापन केली आहे. मुर्तीची जडण - घडण बघता ती १२ व्या शतकातील असावी असे वाटतं नाही. मुख्य मुर्ती च्या बाजूला अजुन एक कालिका देवी ची च मुर्ती आहे. गावकरी त्या मुर्ती ला इथली मुळ देवी मानतात परंतु ज्या प्रकारे मंदिराचे रेखीव काम आहे त्यास समरूप भासेल अशी त्या मूर्तीची बांधणी नाही. त्याबद्दल अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर २ सुबक खांब आहेत. उंबरठा उंच व नक्षीदार आहे. (फोटो नं ८)

 मंडप - मंदिरास एकुण ३ कळस आहेत. गाभाऱ्यास लागून १, त्या नंतर मध्य मंडप व मंदिराच्या बाहेरील प्रवेशद्वारास लागुन एक. त्यांतील मध्य मंडप मोठा आहे. पहिल्या मंडपाच्या समोरासमोरील भिंतीमध्ये एक एक उपमंदिर आहे. एकात कालिका देवी सदृश चेहेरा कोरलेला दिसतो (फोटो नं ९).  दुसर्या देव्हाऱ्यात सध्या मुर्ती नाही. कुणीतरी ती उचलली असावी. दुसरा मंडप हा मध्यभागी आहे. यात देखील भिंतींमध्ये उपमंदिरे आहेत. त्यातल्या एकात श्री गणेशाची मुर्ती आहे. मूर्ती प्राचीन वाटते परंतु काही अति उत्सुक व अति भावुक भक्तांनी त्यास कसलाही विचार ना करता शेंदुर फासलेला दिसतो. त्यामुळे श्री गणेशाची मुर्ती तिचे प्राचीनत्व हरवुन बसली आहे (फोटो नं ११).  तीनही मंडपाचे कळस हे अष्टकोनी आहेत. तसेच तिन्ही कळसाच्या अष्टकोनी कवचात प्रत्येकी एका मध्ये एक असे ४ वर्तुळे आहेत (फोटो नं १२). सर्वात बाहेरील मंडपाच्या कळसात जे वर्तुळ आहे त्यावर एकुण ३२ पाकळ्या कोरलेल्या आहेत (फोटो नं १४).

मंदिराचे वैशिष्ट्य २ - मंदिराच्या शेवटच्या मंडपाच्या कळसात मध्यभागी एक मुर्ती आहे. ८०० - ९०० वर्ष लोटल्यामुळे काळाच्या ओघात या मुर्तीची बरीच झीज झाली आहे. परंतु अजून सुद्धा मूर्तिकाराच्या शिल्पकलेची खुबी लपून राहत नाही. या मुर्तीत एक तोंड व ५ शरीरे आहेत. पाचही शरीरांची जागा व स्थिती वेगवेगळी आहे, परंतु जेव्हा आपण त्यातील एका कोणत्याही शरीराकडे थोडावेळ एकटक बघतो तेव्हा मध्यभागी असलेले तोंड हे त्याच शरीराचे आहे असा भास होतो. तुम्ही कोणत्याही दिशेने बघा व ५ पैकी कोणत्याही शरीराकडे बघा, तुम्हाला एकाच मूर्ती असल्याचे जाणवेल. मुर्तीची देहबोली बघता, ५ लहान बाळे एकत्र खेळत आहेत असा भास होतो. ती मुर्ती बाळकृष्णाची असावी असे माझे मत आहे. अधिक अभ्यासाची गरज आहे. (फोटो नं १४)

विहीर - मंदिराच्या मागे उजव्या बाजुस ही विहीर आहे. ती देखील त्याच काळातील असावी असे वाटते. आता त्यात अस्वच्छता व कचरा पडुन आहे. या विहिरीबद्दल एक दंतकथा एका स्थानिकाने सांगितली. ती येथे सांगणे टाळतो आहे. (फोटो नं १८)

मंदिराची तटबंदी - तटबंदी ही पाषाणाचीच आहे. मंदिराच्या समोरील व उजव्या बाजुची तटबंदी ही १२ व्या शतकातील वाटते. परंतु मागील व डाव्या बाजुची तटबंदी तितकी प्राचीन वाटत नाही. काळाच्या ओघात ती पडली असावी व नंतर कुणीतरी नवीन बांधली असावी. डाव्या बाजूच्या तटबंदीत त्या काळी पायऱ्या असाव्यात. त्या स्थानिकांनी  कापलेल्या असाव्यात(फोटो नं १७). पायऱ्या नक्कीच तटबंदी वर जाण्या साठी असाव्यात. त्यावरून तटबंदी ची भिंत किती जाड व भक्कम असेल याची कल्पना आपण करू शकतो.

                मंदिर जिथे भग्न झाले आहे तिथे सिमेंट व वाळुचे मिश्रण थापले आहे. त्यामुळे मंदिराचे प्राचीन दृश्य स्पष्ट दिसत नाही. या बद्दल "Archaeological Survey of India" हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. केवळ नावाला  डागडुजी होत गेली व मंदिरांचे प्राचीनत्व लयास जात राहिले तर पुढच्या पिढीस ही मंदिरे इतकी प्राचीन आहेत हे आपण कसे पटवून देऊ ??? असो, इतिहास व स्थापत्य यांची आवड असणारे  लोकं  येथे प्रत्यक्ष भेट देऊन १२ व्या शतकात असल्याचा अनुभव  काही काळ तरी घेऊ शकतात. 

 

संदर्भ (References ) - १) खान्देश गॅझेटीयर (१८३०)

                                  २) मंदिर शिल्पे - धुळे जिल्हा    लेखक - श्री मुकुंद धाराशिवकर

                                  ३) लोकदैवते व रथोत्सव   लेखक - डॉ सर्जेराव भामरे

 

२) प्राचीन राम मंदिर -  सहज गावात तपास करत असताना कळले कि येथे १५० वर्षांपूर्वीचे "राम मंदिर" आहे. तिथे गेलो असता मंदिर पाहण्याचा योग आला. मंदिर व मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या संगमरवरी मुर्त्या अतिशय सुबक आहेत. मंदिराचे छत संपुर्ण लाकडाच्या नक्षीने मढवलेले आहे. शिरुड येथे आल्यास हे मंदिर बघणे टाळु नका. (फोटो नं २१,२२)

नमस्ते.


 



Add caption






















ENGLISH VERSION

Ancient Khandesh - Part 1

1) Kalika Devi Temple (12th Century) - Hemadpanti Temple

        The temple is located in a small village called "Shirud" in Dhule district. According to the reference books I referred, this temple must have been in the 12th or 13th century. The construction of the temple is in “Hemadpanti” Style. The temple looks like a fort. (Photo No. 20) The temple has 2 entrances. (Photo No. 3, 4) There is a small bastion (Buruj)  at the main entrance on the outside, with a beautiful linear wheel sculpture on it. There are a total of 24 petals in that chakra.

        Features of the temple 1 - This temple does not have peaks (Shikhar), maybe this is a feature of Hemadpanti temples. But when we enter the assembly hall of the temple and look at the summit (Kalasha), the summit feels very deep, looking at the depth of the summit, it seems that there should be a high peak (Shikhar) on it. This feature of Indian architecture seems to be underlined.

Sanctuary (Garbhagruha) - The sanctuary is quite spacious. The apex is octagonal. An idol of Goddess Kalika has been installed in the small sanctorum. Looking at the structure of the sculpture of Kalika Devi, it does not seem to be from the 12th century. Next to the main idol is another idol of Goddess Kalika. The villagers consider the idol to be the original goddess of the place but the construction of the idol is not in line with the way the linear work of the temple is done. There needs to be more study on that. There are 2 beautiful pillars at the entrance of the sanctum sanctorum. The threshold is high and embossed. (Photo No. 8)

 Mandap - The temple has a total of 3 Mandapa. One adjacent to the temple, then to the central pavilion and one adjacent to the outer entrance of the temple. The central pavilion is large. There is a sub-temple in the front wall of the first pavilion. In one, a face like Kalika Devi is carved (Photo No. 9). Another temple does not currently have an idol. Someone must have picked it up. The second pavilion is in the middle. It also has sub-temples in the walls. One of them has an idol of Lord Ganesha. The idol seems to be ancient but some very strange and over passionate devotees have painted it with “Shendur Colour”.  Therefore, the idol of Lord Ganesha has lost its antiquity (Photo No. 11). The tops of all three tents are octagonal. Also, in the octagonal shell of the three heads, there are 4 such circles in each one (Photo No. 12). A total of 32 petals are carved on the circle at the top of the outermost pavilion (Photo No. 14).

Features of the temple 2 - There is an idol in the centre of the top of the last Mandapa of the temple. Due to the passage of 800-900 years, this idol has suffered a lot in the course of time. But still the sculptor's sculptural talent is not hidden. This idol has a mouth and 5 bodies. The position and position of all the five bodies are different, but when we look at any one of them for a while, the mouth in the middle seems to belong to the same body. If you look in any direction and look at any of the 5 bodies, you will realize that there is only one idol. Looking at the body language of the idol, it seems that 5 little babies are playing together. I think that idol should be of Balkrishna. More study is needed. (Photo No. 14)

 

Well - This well is on the right side behind the temple. She also seems to be from the same period. Now there is filth and garbage in it. A legend told a legend about this well. She avoids telling here. (Photo No. 18)

 

The Wall compound of the temple - The ramparts are made of stone. The ramparts in front of the temple and on the right side date back to the 12th century. But the back and left ramparts do not seem so ancient. In time, it may have fallen off, and then someone built a new one. The ramparts on the left should have steps. They must have been cut by the locals (Photo No. 17). Stairs should definitely be for going up the ramparts. From that we can imagine how thick and strong the rampart wall might be.

             A mixture of cement and sand has been placed where the temple has collapsed. So the ancient view of the temple is not clear. The Archaeological Survey of India needs to intervene. If repair is done only for formality, the antiquity of the temples continues to decline, how can we convince the next generation that these temples are so ancient ??? Anyway, people who are interested in history and architecture can visit here and experience the 12th century for a while.  

References - 1) Khandesh Gazetteer (1830)

                       2) “Mandir Shilpe Dhule Jilha” – written by Shri Mukund Dharashivkar

                       3) “Lokadaivate va Rathotsava” - written by Dr. Sarjerao Bhamre

 

2) Ancient Ram Temple - While interrogating with local people in Shirud village, I came to know that there is a "Ram Temple" here which is 150 years old. While visiting there, I came across a temple. The marble idols of Ram, Laksmana and Sita are very beautiful. The roof of the temple is covered with wood carvings. If you come to Shirud, don't miss this temple. (Photo No. 21, 22)

Namastey !!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

AN ANCIENT "SHIVA TEMPLE" AT MAHADEVAPURA

अहिल्यापुर येथील होळकरकालीन बारव (प्राचीन खान्देश) (ता. शिरपूर जि. धुळे)

#Darbhavati_(Dabhoi) Town in Gujrat State near Vadodara