कायावरोहण (Gujrat State) - भाग एक
कायावरोहण - भाग एक ( 07/03/2021 ) बडोद्यापासुन साधारण ३० कि.मी. वर "कारवण" नावाचे गाव आहे. यास "कायावरोहण" असे सुद्धा नाव आहे. या गावात एक अतिशय प्राचिन मंदीर असुन इ.स. २ शतकातले आहे. दन्तकथेनुसार "लकुलीश" महादेव हे मुलाच्या अवतारात येथे अवतरले. "काय" म्हणजे शरीर व "अवरोहण" म्हणजे प्रकट होणे. शैव पन्थियांच्या अनुसार लकुलीश महादेवानी शरिर रुपात येथे २८ वा अवतार घेतला म्हणून या गावाचे नाव "कायावरोहण" असे आहे. अपभ्रंशाने ते कारवण झाले. या गावात अनेक प्राचिन घरे व मंदीरे आहेत. प्राचीन मन्दिरावर परकिय सत्ताधिशांनी आक्रमण करुन ते नष्ट केले. परंतु शिवलींग वाचले ते सध्या नविन मंदिर जे स्वामी क्रिपलवानन्द यानी बान्धले आहे तिथुन २ कि.मी. असलेल्या प्राचिन मन्दीरावर स्थित आहे. त्या मन्दिराचा फक्त पायाच शिल्लक आहे. कायावरोहन हे पुरातत्वशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे आणि A.S.I. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने कारवणला वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध केले आहे आणि या जागेभोवती सापडलेल्या अवशेषांसाठी एक विशेष संग्रहालय स्थापित...