कायावरोहण (Gujrat State) - भाग एक

 

कायावरोहण - भाग एक ( 07/03/2021 )

बडोद्यापासुन साधारण ३० कि.मी. वर "कारवण" नावाचे गाव आहे. यास "कायावरोहण" असे सुद्धा नाव आहे. या गावात एक अतिशय प्राचिन मंदीर असुन इ.स. २ शतकातले आहे. दन्तकथेनुसार "लकुलीश" महादेव हे मुलाच्या अवतारात येथे अवतरले. "काय" म्हणजे शरीर व "अवरोहण" म्हणजे प्रकट होणे. शैव पन्थियांच्या अनुसार लकुलीश महादेवानी शरिर रुपात येथे २८ वा अवतार घेतला म्हणून या गावाचे नाव "कायावरोहण" असे आहे. अपभ्रंशाने ते कारवण झाले.

 या गावात अनेक प्राचिन घरे व मंदीरे आहेत. प्राचीन मन्दिरावर परकिय सत्ताधिशांनी आक्रमण करुन ते नष्ट केले. परंतु शिवलींग वाचले ते सध्या नविन मंदिर जे स्वामी क्रिपलवानन्द यानी बान्धले आहे तिथुन २ कि.मी. असलेल्या प्राचिन मन्दीरावर स्थित आहे. त्या मन्दिराचा फक्त पायाच शिल्लक आहे.

कायावरोहन हे पुरातत्वशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे आणि A.S.I. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने कारवणला वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध केले आहे आणि या जागेभोवती सापडलेल्या अवशेषांसाठी एक विशेष संग्रहालय स्थापित केले आहे. करवण हे भारतीय वारसा स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणाहून दुसऱ्या शतकातील प्राचीन शिल्पे आणि अवशेष उत्खननात सापडले आहेत. कायावरोहणातून असंख्य हिंदू शिल्पे, तांब्याची नाणी, एका तपस्वीचे भव्य मस्तक, कार्तिकेयची प्रतिमा आणि उमा महेश्वराची मूर्ती आणि अतुलनीय पुरातत्वीय नमुने सापडलेल आहेत. संग्रहातिल प्राचिन मुर्ती, शिल्पे यांबद्दल पुढील भागात लिहिन, तोपर्यन्त या सुन्दर व परकिय आक्रमणांना पुरुन उरलेल्या मंदीराच्या बोलक्या अवशेषांचा आढावा घ्या

 © नरेन्द्र ध. याज्ञिक (9421655695)

 Visited to this place – 07/03/2021

Reference - The Archaeology of Sacred spaces : The temple in western India written by Susan Verma Mishra, ‎Himanshu Prabha Ra


Kayavarohan - Part One ( 07/03/2021 )

 

There is a village called "Karvan" about 30 km from Baroda. It is also known as "Kayavarohan". There is a very ancient temple in this village. It is from the 2nd century. According to anecdotes, "Lakulish" Mahadev incarnated here as a boy. "Kaya" means body and "Avarohan" means to appear. According to Shaivite sects, Lakulish Mahadeva took the 28th incarnation here as a body, hence the name "Kayavarohan".

 The village has many ancient houses and temples. The ancient temple was attacked and destroyed by foreign rulers. But the Shivlinga survived and it is situated now 2 km from the new temple built by Swami “Kripalvananda”. It is located on the base of an ancient temple. Only the base of that temple remained here.

Kayavrohan is a very important archaeological site and Archaeological Survey of India has listed Karvan as a heritage site and has set up a special museum for the remains found around the site. Karvan is one of the Indian heritage sites. Ancient sculptures and relics of the second century have been excavated from this place. Numerous Hindu sculptures, copper coins, a magnificent head of an ascetic, a sculpture of Kartikeya and an idol of Uma Maheshwar and many other archaeological specimens have been found in the periphery. I will write about the ancient idols and sculptures in the next section, till review the eloquent remnants of the temple which have survived from the foreign invaders.

 © Narendra D Yadnik (9421655695)

Visited to this place – 07/03/2021

Reference - The Archaeology of Sacred spaces : The temple in western India written by Susan Verma Mishra, ‎Himanshu Prabha Ra

















Comments

Popular posts from this blog

AN ANCIENT "SHIVA TEMPLE" AT MAHADEVAPURA

अहिल्यापुर येथील होळकरकालीन बारव (प्राचीन खान्देश) (ता. शिरपूर जि. धुळे)

#Darbhavati_(Dabhoi) Town in Gujrat State near Vadodara