कायावरोहण - भाग २ ( 11/12/2021 )
कायावरोहण - भाग २ ( 11/12/2021 ) मागील भागात आपण "कायावरोहण" या प्राचीन गावा विषयी माहिती घेतली. आता पुढील भागात "भारतीय पुरातत्व विभाग" यांच्या नियंत्रणात असलेल्या Museum बद्दल माहिती बघु. या Museum मध्ये कायावरोहण व गोरज या दोन्ही गावांमधील पुरातत्व उत्खननात सपदलेल्या विविध प्राचीन मुर्त्यांचा समावेष केला आहे. गोरज हे देखील अतिशय प्राचीन गाव असुन पुरातत्व दृष्ट्या अतिशय महत्व राखुन आहे. या गावात अनेक ठिकाणी विविध प्राचीन अवशेष विखुरलेल्या स्वरुपात आहेत. त्याबद्दल पुढील भागात बघु. या Museum मध्ये ९-१० व्या शतकातिल मुर्त्या जास्त संख्येत आहेत. एक जैन तिर्थंकरांची मुर्ती ८ व्या शतकातील आहे. मुर्ती पद्मासनात स्थित आहे , तसेच या मुर्तिचे शीर जागेवर नसुन धडापासुन वेगळे झाले आहे. अनेक मुर्ती अशाच भग्न स्वरुपातील आहेत. सगळ्या मुर्ती निट बघितल्यास , काळानुसार झिज न होता , हेतूपुरस्कर हल्ला करुन मुर्ती वि...