Posts

Showing posts from November, 2022

"शिकारी बंगला" ( “Hunting House” ) @ Vadodara

Image
  " शिकारी बंगला"             अनेक दिवसांपासुन इंटरनेट वर बघुन होतो की महि नदीच्या किनारी एक जुना बंगला "गायकवाड" राजवटीत बांधला गेला होता. फोटो तर सुंदरच दिसतो , परंतु काही वास्तु प्रत्यक्ष बघितल्यावरच त्यांचा लौकिक कळतो. अखेर प्रतीक्षा संपली आणि आम्ही तिथे पोहोचलो. छान छोटंसं गाव आहे , गुगल मॅप मुळे लगेच सापडतं. बंगल्या पर्यंत आपण सहज पोहोचतो. एक watchman काका असतात. असं म्हणतात की "गायकवाड राजवटीत" हा बंगला शिकार करण्यासाठी वापरण्यात येत असे. तसे संदर्भ विविध पुस्तकात मिळतात. गावातील लोकं देखील त्याबद्दल सांगतात.             तेथील स्थानिक लोकांशी बोलल्यावर कळले की या बंगल्याच्या बाजुला घोडे बांधण्यासाठी तबेला होता , तो कालान्तराने पडला. राजे महाराजे इथे शिकारीसाठी आल्यावर मुक्कामी राहत असत , त्या अनुषंगाने इथे सुसज्ज किचन देखील बांधले होते , ते देखील पडले परंतु त्याचे अवशेष अजून आहेत. एक वेगळी खोली फक्त शस्त्रास्त्रांनी भरलेली असे . राजा सोबत एक ब्रिटिश अधिकारी देखील मदतीस व देखरेखीसाठी राहत असे. पूर्वी 2 राजान्...