Posts

"शिकारी बंगला" ( “Hunting House” ) @ Vadodara

Image
  " शिकारी बंगला"             अनेक दिवसांपासुन इंटरनेट वर बघुन होतो की महि नदीच्या किनारी एक जुना बंगला "गायकवाड" राजवटीत बांधला गेला होता. फोटो तर सुंदरच दिसतो , परंतु काही वास्तु प्रत्यक्ष बघितल्यावरच त्यांचा लौकिक कळतो. अखेर प्रतीक्षा संपली आणि आम्ही तिथे पोहोचलो. छान छोटंसं गाव आहे , गुगल मॅप मुळे लगेच सापडतं. बंगल्या पर्यंत आपण सहज पोहोचतो. एक watchman काका असतात. असं म्हणतात की "गायकवाड राजवटीत" हा बंगला शिकार करण्यासाठी वापरण्यात येत असे. तसे संदर्भ विविध पुस्तकात मिळतात. गावातील लोकं देखील त्याबद्दल सांगतात.             तेथील स्थानिक लोकांशी बोलल्यावर कळले की या बंगल्याच्या बाजुला घोडे बांधण्यासाठी तबेला होता , तो कालान्तराने पडला. राजे महाराजे इथे शिकारीसाठी आल्यावर मुक्कामी राहत असत , त्या अनुषंगाने इथे सुसज्ज किचन देखील बांधले होते , ते देखील पडले परंतु त्याचे अवशेष अजून आहेत. एक वेगळी खोली फक्त शस्त्रास्त्रांनी भरलेली असे . राजा सोबत एक ब्रिटिश अधिकारी देखील मदतीस व देखरेखीसाठी राहत असे. पूर्वी 2 राजान्...

कायावरोहण - भाग २ ( 11/12/2021 )

Image
  कायावरोहण - भाग   २ ( 11/12/2021 )                 मागील भागात आपण "कायावरोहण" या प्राचीन गावा विषयी माहिती घेतली. आता पुढील भागात "भारतीय पुरातत्व विभाग" यांच्या नियंत्रणात असलेल्या Museum बद्दल माहिती बघु. या Museum मध्ये कायावरोहण व गोरज या दोन्ही गावांमधील पुरातत्व उत्खननात सपदलेल्या विविध प्राचीन मुर्त्यांचा समावेष केला आहे. गोरज हे देखील अतिशय प्राचीन गाव असुन पुरातत्व दृष्ट्या अतिशय महत्व राखुन आहे. या गावात अनेक ठिकाणी विविध प्राचीन अवशेष विखुरलेल्या स्वरुपात आहेत. त्याबद्दल पुढील भागात बघु.               या Museum मध्ये ९-१० व्या शतकातिल मुर्त्या जास्त संख्येत आहेत. एक जैन तिर्थंकरांची मुर्ती ८ व्या शतकातील आहे. मुर्ती पद्मासनात स्थित आहे , तसेच या मुर्तिचे शीर जागेवर नसुन धडापासुन वेगळे झाले आहे. अनेक मुर्ती अशाच भग्न स्वरुपातील आहेत. सगळ्या मुर्ती निट बघितल्यास , काळानुसार झिज न होता , हेतूपुरस्कर हल्ला करुन मुर्ती वि...

कायावरोहण (Gujrat State) - भाग एक

Image
  कायावरोहण - भाग एक ( 07/03/2021 ) बडोद्यापासुन साधारण ३० कि.मी. वर "कारवण" नावाचे गाव आहे. यास "कायावरोहण" असे सुद्धा नाव आहे. या गावात एक अतिशय प्राचिन मंदीर असुन इ.स. २ शतकातले आहे. दन्तकथेनुसार "लकुलीश" महादेव हे मुलाच्या अवतारात येथे अवतरले. "काय" म्हणजे शरीर व "अवरोहण" म्हणजे प्रकट होणे. शैव पन्थियांच्या अनुसार लकुलीश महादेवानी शरिर रुपात येथे २८ वा अवतार घेतला म्हणून या गावाचे नाव "कायावरोहण" असे आहे. अपभ्रंशाने ते कारवण झाले.   या गावात अनेक प्राचिन घरे व मंदीरे आहेत. प्राचीन मन्दिरावर परकिय सत्ताधिशांनी आक्रमण करुन ते नष्ट केले. परंतु शिवलींग वाचले ते सध्या नविन मंदिर जे स्वामी क्रिपलवानन्द यानी बान्धले आहे तिथुन २ कि.मी. असलेल्या प्राचिन मन्दीरावर स्थित आहे. त्या मन्दिराचा फक्त पायाच शिल्लक आहे. कायावरोहन हे पुरातत्वशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे आणि A.S.I. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने कारवणला वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध केले आहे आणि या जागेभोवती सापडलेल्या अवशेषांसाठी एक विशेष संग्रहालय स्थापित...

अहिल्यापुर येथील होळकरकालीन बारव (प्राचीन खान्देश) (ता. शिरपूर जि. धुळे)

Image
         तेजस्विनी अहिल्याबाई होळकर यांनी संपूर्ण देशभर अनेक विहिरी, घाट, मंदिरे बांधली. त्यातली एक मोठी पायविहीर निदर्शनास आणत आहे. अहिल्यापुर गावात (शिरपुर तालुका, धुळे जी.) सदर पायविहीर बांधलेली असून तिचा स्पष्ट उल्लेख कुठे आढळून येत नाही. बांधकाम कधी केले त्याबद्दलही एकमत नाही. परंतु हि पायाविहीर अतिशय सुबक, मजबुत व होळकर कालीन आहे हे निश्चित. बाहेरून विहीर पडक्या अवस्थेत दिसते, भिंतींवर पिंपळाची झाडे वाढली आहेत, परंतु पायऱ्यानी विहिरीत प्रवेश केल्यावर तिची भव्यता अचंबित करते. ज्या कोणी अभियंत्याने हि विहीर बनवली असेल त्याच्या कौशल्यास दाद द्यावी लागेल. एखादा छोटा राजवाडा असावा त्या प्रमाणे बांधकाम आहे. विहीर एकूण तीन टप्प्यात बांधलेली असून, जसे जसे आपण पुढील दालनात जातो तशी तशी या विहिरीची सुबकता आकर्षित करते. प्रत्येक दालनात महिरपी कमानी आहेत. विहिरीस सुरवाती पासून शेवटपर्यंत एकूण १०६ दगडी पायऱ्या आहेत. विहिरीचे बांधकाम दगड व विटांनी झाले आहे. भिंतींचा पाया चौकोनी दगडांचा असुन त्यावर विटांचा थर रचला आहे. भिंतींमध्ये काही ठिकाणी चक्र, उपद...